29 C
Mumbai
Wednesday, May 1, 2024
Homeराष्ट्रीयभुस्खलनात 60 हून अधिक जवानांचा मृत्यू

भुस्खलनात 60 हून अधिक जवानांचा मृत्यू

टीम लय भारी

मणिपुर: भारताच्या पुर्वेकडील राज्यांना गेल्या काही दिवसांपासून पावसाने झोडपून काढले आहे. हिमालयांच्या डोंगर रांगांमध्ये पावसाची जोरदार बॅटींग सुरु आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्या आहेत. रात्री झालेल्या मुसळधार पावसाने मणिपूरच्या नोनी जिल्हयातील तुपुल रेल्वेस्टेशन जवळ भूस्खलनाची घटना घडली. त्यामध्ये 100 जवान गाडले गेल्याची शक्यता आहे. 17 जवानांचे मृत देह बाहेर काढण्यात यश आले आहे. आणखी 60 मृतदेह मिळण्याची शक्यता आहे. सुमारे 107 जवान या दुर्घटनेमध्ये सापडले होते. त्यातील काहींना वाचवण्यात यश आले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मणिपुरचे मुख्यमंत्री बीरेन सिंह यांनी आपात्कालीन परिस्थिवर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीची बैठक बोलावली. मदत कार्यासाठी डॉक्टरांची टीम घटनास्थळी दाखल झाली. तसेच उत्तर भारतामध्ये सर्वदूर पावसाची शक्यता आहे. दिल्ली, बिहार, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, आसाममध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. पटनामध्ये दुचाकीवर वीज कोसळल्याने दुचाकी जळून खाक झाली. तसेच 12 दुकाने देखील जळून खाक झाली. दुकानदारांचे कोटयवधींचे नुकसान झाले आहे.

आज 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागाने दिली आहे. त्यामुळे उत्तरेकडील जिल्हयांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. शनिवार व रविवारी हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे. काही दिवसांपासून दिल्लीकर उकाडयाने हैराण झाले होते. कालपर्यंत दिल्लीचे तापमान 40 अंश सेल्सीअस होते. आज सकाळी आलेल्या पावसाने नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

हे सुध्दा वाचा:

फडणवीस सरकारमध्ये कुणाला मिळणार मंत्रीपदे ?, यादी व्हायरल

ट्विटरवर समस्या मांडली, अन् ती उद्धव ठाकरे यांनी ऐकून घेतली

अखेर राज्यातील ‘सत्ता’नाट्याला लागला पूर्णविराम

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी